Kopargaon Leopard Attacks Child : कोपरगावमधील शिंगणापूर येथे एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. पण बिबट्याच्या तावडीतून त्याला त्याच्या आईनं जिवाचा आकांत करुन वाचवलं.
शेरणी झाली आई !
आई मंदाबाई पवार यांना मुलाचा आर्त आवाज ऐकू आला आणि त्याक्षणी त्या आई नव्हे तर खऱ्या अर्थाने ‘शेरणी’ बनल्या! क्षणाचाही विचार न करता त्या थेट बिबट्याच्या मागे धावत गेल्या आणि त्याची शेपटी पकडून जीवाच्या आकांताने ओढू लागल्या. आईच्या या धाडसाने बिबट्या चांगलाच दचकला आणि त्याने दिव्यांशला सोडून माघार घेतली. अखेर आईच्या धाडसापुढे क्रूर बिबट्याला हार मानावी लागली. या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याला तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्याला तातडीने नगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होणार, मंत्रिमंडळात फेरबदल होणार?
रुग्णवाहिकेचा खोळंबा, मदतीचा हात
विशेष म्हणजे, यावेळी 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, स्थानिक संजीवनी युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या मदतीने चिमुकल्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी मंदाबाईंच्या धैर्याला सलाम केला असून, उपसरपंच श्याम संवत्सरकर, माजी सरपंच कैलास संवत्सरकर, दत्ता संवत्सरकर आणि ग्रामसेवक अविनाश पगारे यांनी पुढाकार घेत या गरीब कुटुंबाला मदतीचा आधार दिला आहे. आईची माया जगातल्या प्रत्येक भीषण शक्तीवर मात करू शकते, हे मंदाबाई पवार यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
दोस्त दोस्त ना रहा; बर्थडे पार्टीत राडा, बीअरची बाटली मित्राच्या डोक्यात घातली, चाकूने भोसकलं अन्… कोल्हापुरात खळबळ
वनविभागाच्या कारभारावर संताप
गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. जनावरे, पाळीव प्राणी आणि आता निरागस मुलेसुद्धा असुरक्षित झाली आहेत. यापूर्वी कोल्हे वस्ती आणि टाकळी फाटा परिसरातही अशा घटना घडल्या आहेत. बिबट्यांचे हल्ले वाढत असतानाही वनविभागाचे दुर्लक्ष नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे. कोपरगाव येथे तीन तालुक्यांचे मुख्य वनविभागाचे कार्यालय असूनही गेल्या वर्षभरापासून येथे पूर्णवेळ अधिकारी नसल्याने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. वनविभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. कोपरगाव वनविभागाच्या कार्यालयाला पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी कधी मिळणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

