Jaykumar Gore : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले
नाव न घेता माजी आमदारांना विरोध
भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी आमदार दिलीप माने हे लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. दिलीप मानेंचं नाव न घेता जबरदस्त विरोध करत भाजपमधील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसला भाजपमधून विरोध होत असल्याने राज्यातील भाजपला जबर धक्का बसला आहे.
Rupesh More : वसंत मोरेंचा लेक पुणे महापालिकेच्या आखाड्यात? डबल मुहूर्त साधत तात्यांचे संकेत, मुलाचा पहिलीतला फोटो शेअर करत म्हणाले…
काँग्रेस-राष्ट्रवादीमधून चार दिग्गज नेते भाजपात
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते आणि चार माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे व त्यांचे दोन सुपुत्र, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही दिवाळीनंतर भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली आहे. इतर पक्षातून आयात झालेले नेते भाजपात आल्यावर जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार, अशी खंत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली आहे.
Murlidhar Mohol : सुनील शेळकेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिलेली, मोहोळांनी किस्सा सांगितला, आण्णा म्हणाले, तिथे चंद्रकांतदादा…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसला धक्का
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस राबवत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा आहे. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे वर्चस्व आहे. दिलीप मानेंच्या पक्ष प्रवेशामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार सुभाष देशमुख यांना जड जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय केला आहे, आता आम्ही त्यांच्याच दावणीला बांधले जाणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे.

