Nanded Hadapsar Special Train : दिवाळीसाठी खास बस-रेल्वे सोडल्या जात आहेत. याचदरम्यान मुंबई-पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून नांदेड-हडपसर दरम्यान विशेष रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नांदेड – हडपसर – नांदेड विशेष ट्रेन
नांदेड – हडपसर – नांदेड या विशेष ट्रेनमुळे पुण्यामधून दिवाळीसाठी मराठवाड्याकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. तसंच मराठवाड्यातून पुण्याकडे येण्याऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. नांदेड – हडपसर – नांदेड या विशेष रेल्वेला एकूण 22 डबे असतील.
Pune News : मुठा नदीच्या दोन्ही बाजूंना तयार होतोय सेवा रस्ता, महामार्गावरील कोंडी होणार कमी; कुठून-कसा असेल मार्ग?
अशी धावणार विशेष रेल्वे : नांदेड- हडपसर विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या
रेल्वे क्रमांक 07606 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष रेल्वे 21 ऑक्टोबर, आणि 28 ऑक्टोबर मंगळवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी शहर, कुडूवाडी, दौंडमार्गे अशी स्थानकं घेत हडपसर येथे रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.
Mumbra Train accident : गर्दी कमी करण्यासाठी टास्क फोर्स, सरकारचं नवं पाऊल
हडपसर – नांदेड विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या
रेल्वे क्रमांक 07608 हडपसर ते हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे 21 ऑक्टोबर, आणि 28 ऑक्टोबर रोजी मंगळवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर दौंड, लातूर, परळी, परभणीमार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल.

