• Tue. Jun 9th, 2026

    हुबळी एक्सप्रेस दगडफेक प्रकरण: अल्पवयीन आरोपीस अटक, पोलिसांच्या चोख कामगिरीचं प्रवाशांकडून कौतुक

    हुबळी एक्सप्रेस दगडफेक प्रकरण: अल्पवयीन आरोपीस अटक, पोलिसांच्या चोख कामगिरीचं प्रवाशांकडून कौतुक

    Hubli Express, Karjat News: कर्जत रेल्वे पोलिसांनी हुबळी एक्सप्रेसमध्ये प्रवाशावर दगडफेक करून गंभीर जखमी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रायगड, अमुलकुमार जैन:
    कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय तपास करत हुबळी एक्सप्रेसमध्ये प्रवाशावर दगडफेक करून गंभीर जखमी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले आहे. तत्परतेने केलेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    दरम्यान, ही घटना १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता घडली होती. दादर ते बेळगावदरम्यान धावणाऱ्या हुबळी एक्सप्रेस (क्र. १७३१८) या गाडीच्या जनरल डब्यात तौसिफ हसन साहब हतरवाड (वय १९, रा. बेळगाव, कर्नाटक) हे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, बदलापूर ते वांगणी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गाडीच्या खिडकीवर दगडफेक केली. हा दगड थेट प्रवाशाच्या डोळ्याला लागला. त्यामुळे फिर्यादीच्या उजव्या डोळ्याजवळ जबर दुखापत झाली.
    Maharashtra Timesजेव्हा कुंपणच शेत खातं; साई संस्थानच्या 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
    जखमी तौसिफ यांना तत्काळ सातारा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेवरून कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गु.र. क्र. १५४/२०२५, कलम BNS १२५, १२५(b) व भारतीय रेल्वे अधिनियम १५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मा. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त जडगे व सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. विशेष तपास पथकात PSI भाऊसाहेब कुरुंद, PSI प्रवीण कड, तसेच पोलीस शिपाई चोरमले, तुरडे व सेलोटे यांचा समावेश होता.

    गुप्त माहितीच्या आधारे पथकाने वांगणी परिसरात शोध मोहीम राबवली आणि सार्थक संजय वाल्मिकी (वय १७, रा. वांगणी, ता. अंबरनाथ) या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी वेळेवर आणि प्रभावीपणे तपास केल्याबद्दल कर्जत रेल्वे जिआरपी पथकाचे प्रवाशांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. रेल्वे पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे प्रवाशांचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे — ‘कर्जत जिआरपी’चं काम खरोखरच प्रशंसनीय आहे, असे उद्गार प्रवाशांनी काढले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा