Pune Ring Road : पुणे रिंग रोडचं काम सुरू असून सांगरूण ते मालखेड ही गावं जोडण्यासाठी 8 पदरी आणि 650 मीटर लांब उड्डाणपूल उभारला जात आहे. या पुलासाठी 276 खड्डे करण्यात येणार असून त्यापैकी 120 खड्डे पाण्यात घेतले जाणार आहे.
रिंग रोडने जाणाऱ्या प्रवाशांना धरणाचं पाणलोट क्षेत्र पाहता येणार
पुणे जिल्ह्यात अशा प्रकारे मोठा कोणताही पूल कोणत्याही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नाही, त्यातच रिंग रोडसाठी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे विरुद्ध दिशेची गावे या पुलामुळे जोडली जाणार आहेत. अर्थात, हा द्रुतगती मार्ग असल्याने स्थानिक ग्रामस्थांना त्याचा उपयोग होणार नाही. मात्र काही वर्षांत रिंग रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे विहंगम दृश्य या पुलावरून अनुभवता येणार आहे. धरणाच्या परिसरात एप्रिल महिन्यापासून काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलासाठी उभारण्यात येणाऱ्या खांबांमध्ये 40 ते 60 मीटरचे अंतर असेल. हा उड्डाणपूल 8 पदरी असणार आहे. ‘नवयुगा’ कंपनीमार्फत हे काम सध्या सुरू आहे.
पुणेकरांचा प्रवास आता सुस्साट होणार, एक तासाचं अंतर ५ ते १० मिनिटांत कापलं जाणार; कुठे-कसे असणार मार्ग?
जमिनीत 156 खड्डे, तर पाण्यात 120 खड्डे
‘स्टील, काँक्रिट किंवा लाकडापासून बनवलेले खांब म्हणजेच ‘पाइल फाउंडेशन.’ या तंत्राद्वारे खडकवासला धरणाच्या पाण्यात खड्डे घेऊन खांब उभारण्यात येत आहेत. उड्डाणपुलासाठी एकूण २७६ खड्डे घेण्यात येणार आहेत. त्यापैकी 156 खड्डे जमिनीत आणि 120 खड्डे पाण्यात घेतले जाणार आहेत. आतापर्यंत पाण्यात 59 खड्डे घेण्यात आले आहेत,’ अशी माहिती उड्डाणपुलाचे अभियंता रितेश भारद्वाज यांनी दिली.
Pune News : पुण्यात 28 किमीचा नवा बोगदा, तीन वर्षात काम पूर्ण होणार; खडकवासलापासून टनल खोदाई यु्द्धपातळीवर सुरू, कसे असणार मार्ग?
सहा तालुक्यांतील 82 गावांमधून रिंग रोडचा मार्ग
पुण्याचा रिंग रोड पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागांत साकारला जाणार आहे. अडीच वर्षांत हा रिंग रोड पूर्ण करण्याचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. पुरंदर, हवेली, भोर, खेड, मावळ, मुळशी या सहा तालुक्यांतील ८२ गावांमधून हा रिंग रोड जात आहे.
पुणे रिंग रोडच्या कामगारांना दमदाटी, काम ठप्प, व्हिडिओ व्हायरल
एकूण 55 हजार 622.33 कोटी खर्च
पश्चिमेच्या रिंग रोडसाठी २२ हजार ५३६ कोटी, पू्र्वसाठी १९ हजार ७४१ कोटी आणि पूर्व भागाच्या विस्तारिकरणासाठी १३ हजार ३४४ कोटी असा एकूण ५५ हजार ६२२.३३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी प्रत्यक्षात नुकतीच पश्चिम रिंग रोडच्या भागाला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली; तसेच कामांना गती देण्याचे आदेशही दिले आहेत.

