• Sat. Jun 13th, 2026

    ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘कृषी क्षेत्र’ नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 11, 2025
    ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘कृषी क्षेत्र’ नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. 11: आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे श्रीमंत-गरीब, जाती, भाषा असा फरक करत नाही. म्हणूनच हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयांच्या कल्पनांना आकार देऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या उत्सवाचे मेहबुब स्टुडिओ, वांद्रे येथे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

      कार्यक्रमाला एचपी इंडिया च्या  व्यवस्थापकीय संचालिका इप्सिता दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, विपणन प्रमुख आकाश भाटिया, कायदेशीर व शासकीय व्यवहार विभाग प्रमुख राजू नायर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण सुरू केले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले असून यात प्रत्येक जण आपल्या कल्पनांना वास्तवात आणू शकणार आहे. शासनाने एचपी सोबत डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले असून आता आणखी पुढे जाऊन सर्वसामान्यांना नव्या तंत्रज्ञानांचा, विशेषतः AI चा, सहज प्रवेश मिळावा यासाठी भागीदारीचा आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे. कृषी क्षेत्रातही AI चा वापर सुरू केला आहे. पुण्यात झालेल्या अ‍ॅग्री-हॅकथॉनमध्ये तरुणांनी तयार केलेले AI मॉडेल हे हवेतील घटकांचे विश्लेषण करून पिकावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि सर्तक करते. हे खरोखरच गेम-चेंजर मॉडेल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले की, अशा तांत्रिक हस्तक्षेपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, खर्च कमी होईल आणि कृषीक्षेत्रात अधिक नफा मिळेल. AI, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशन या तंत्रज्ञानांनी केवळ उद्योगच नव्हे तर शासन प्रणालीतही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.

    या कार्यक्रमात देशभरातील जवळपास 40 हजार तरुणांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 40 सर्वोत्तम नवीन कल्पक उपक्रमांचा सन्मान करण्यात आला. हे 40 नवीन उपक्रम समाजात आणि अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष परिणाम करू शकतील या उपक्रमांच्या माध्यमातून नागरीकांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed