सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला रीलस्टार भैय्या गायकवाड छत्रपती संभाजीनगरमधील एका टोलनाक्यावर मारहाण झाल्याने चर्चेत आहे. फास्टटॅग नसल्याने पैसे देण्यास नकार देत टोल कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याने त्याला मारहाण झाली. या घटनेनंतर भैय्या गायकवाडने सोशल मीडियावर धमकी देत बदला घेण्याची भाषा केली आहे.
मारहाण प्रकरण काय?
रीलस्टार भैया गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमधल्या एका टोलनाक्यावर त्याच्या अरेरावीच्या भाषेमुळे चोप बसला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याचं झालं असं की, भैया गायकवाड व त्याचे काही मित्र छत्रपती संभाजीनगमध्ये कारने प्रवास करत होते. त्यांची कार सावंगीच्या टोलनाक्यावर पोहोचली. यावेळी त्यांच्या कारला फास्ट टॅग नसल्याने त्याला टोलचे पैसै भरावे लागणार होते. यावेळी भैया गाडीतून खाली उतरला व त्याने त्याच्या खास शैलीमध्ये टोल कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली.
खळबळजनक! पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला? सल्लागाराचा मोठा दावा…दरम्यान, यावेळी बोलता बोलता वाद वाढला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे, ज्यामध्ये असं दिसतंय की, भैया गायकवाड व त्याचे सहकारी टोल कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारावरुन हिनवत आहेत. त्यांना दमदाटीही करत आहेत. फास्टटॅग नसतानाही टोलचे पैसे देण्यास नकार दिला. या सर्व प्रकारामुळे टोल कर्माचारी चिडले व सहा कर्मचाऱ्यांनी भैया गायकवाडला मारहाण केली. दरम्यान, रीलस्टार भैया गायकवाड हा मारहाण सुरु असताना माझा व्हिडिओ डिलीट करा, अशा प्रकारची विनवणी करतानाही एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
नवी घडामोड काय?
दरम्यान, ही मारहाण नेमकी कधी झाली हे कळलं नसलं तरी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भैया गायकवाडने मारहाण करणाऱ्यांना पुन्हा एक रील बनवत उघड धमकी दिली आहे. “अरे जळू नका बरोबरी करा. परवा मी सिल्लोडला गेलो होतो. तिकडे सरपंच मंगेशदादा साबळे उपोषणाला बसले होते, त्यांना भेटायला गेलो होतो. तिकडून परत येताना, तुम्ही माझा पाठलाग केला. समृद्धी हायवेने जाताना तुम्ही मला टोलनाक्यावर मारलं. तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, तुम्ही जळू नका बरोबरी करा. आणि काय रे तुम्हाला जिपची आणि थारची काय लेव्हल माहीत आहे का? सांगणं एवढंच आहे, तुम्ही आम्हाला जेवढं मारलंय ना, याचा बदला नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त इकडे या. मित्रानो मला थोडंच लागलंय. काही झालं नाही. ही फक्त जाहिरात होती, पिक्चर अजून बाकी आहे,”, अशा शब्दांत भैया गायकवाडने धमकी दिली आहे.
चंद्रकांतदादांच्या विधानावर मौन सोडलं, गौतमी पाटील स्पष्टच बोलली
त्यामुळे एकूण घडामोड पाहता आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजू्च्या कोणीही पोलिस केस दाखल केलेली नाही आहे, अशीही माहिती मिळते आहे.

