Reel Star Bhaiya Gaikwad Beating Video: वाहनाला फास्ट टॅग नसल्याच्या कारणावरून टोलनाक्यावर राडा झाला. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाद घालणाऱ्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. मारहाण झालेला तरुण रीलस्टार भैय्या गायकवाड असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी टोल नाक्यावर घडली.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी समृद्धी महामार्गाच्या टोलनाका परिसरात त्याला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. टोलनाक्यावर आल्यानंतर त्याच्या गाडीला फास्टटॅग नसल्यानं त्याच्या मित्रांमध्ये आणि टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. भैय्या गायकवाड कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलला आणि वागला असल्याने त्याला मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
‘गुंड परदेशात पळतात, ही मॅरेथॉन काय कमी आहे का?’; पत्रकारांच्या प्रश्नाकडे मुरलीधर मोहोळांचा कानाडोळा, खासदारांचा काढता पाय
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनीच रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कधी घडली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्याचबरोबर या घटनेच्या संदर्भात भैय्या गायकवाड याची प्रतिक्रिया देखील अद्याप समोर आली नाहीय.
शोध घेताच मुलाची बॉडी सापडली, वडिलांना धक्का
दौलताबाद येथील आसेगाव येथील तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा तलावात बुडवून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी (8 ऑक्टोबर) उघडकीस आल्याची माहिती आहे. अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
कोयत्यासह चार जण घुसले अन्…; रेणुका कलाकेंद्रात धक्कादायक घटना; नर्तिकांसोबत अश्लील वर्तनाने खळबळ
अग्निशामक विभागाच्या या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास शोधकार्य केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास विशालचा मृतदेह आढळून आला. विशालला तलावातून बाहेर काढल्यानंतर त्याला तात्काळ छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घडलेल्या या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने गावात एकच शोककळा पसरली आहे.

