Jalgaon Old Lady ashes Stolen : या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली
काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील गायत्री नगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले होते. मयत छबाबाई पाटील यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले नव्हते. दुर्दैवाने याच गोष्टीचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच स्मशानभूमीतून पाटील आजी यांच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली.
Sangli Crime : कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह, वर्षभरातच अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलं, कारण ठरलं सासूच्या…
या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांनीही जळगाव महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या अस्थीही सुरक्षित नाहीत, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला
या प्रकरणी अद्याप पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला, तरी चोरट्यांचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
Pune Accident : बाईक झाडावर आदळली, हेल्मेट असूनही मृत्यूने गाठले, पुण्यातील नवविवाहित तरुणाचा करुण अंत, पत्नीचा टाहो
दरम्यान, पाटील कुटुंबीयांनी “सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,” अशी भावनिक मागणी केली आहे. तसेच, स्मशानभूमीत तात्काळ सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे आता पाटील आजींच्या अस्थी कुटुंबीयांना परत मिळणार का, पोलीस चोरांचा शोध घेण्यात यशस्वी होणार का, आणि या प्रकाराला भविष्यात आळा बसावा, याचा बंदोबस्त करण्यात प्रशासनाला यश येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

