Parbhani Crime News : एआयचा गैरवापर करुन तरुणीचे अश्लील फोटो तयार करण्यात आले. यानंतर या फोटोचा ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करत सतत धमकवण्यात आलं. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार केली.
नेमकं काय घडलं?
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, चार पैकी एका आरोपीने एआय प्रणालीचा वापर करून पीडितेचे अश्लील फोटो तयार केले. त्यानंतर हे फोटो तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. पुढे पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या पीडित मुलीला आरोपीसोबत बोलण्यासाठी भाग पाडलं. त्यानंतर पीडित मुलीच्या घरासमोरच राहणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या खोलीमध्ये येण्यास भाग पाडलं आणि 2024 ते सप्टेंबर 2025 दरम्यान या पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आले.
Raigad News : कर्मचाऱ्याची रुममध्ये बॉडी, जमिनीवर निपचित पडलेला आणि… पंचतारांकित हॉटेलमधील धक्कादायक घटना
शिक्षकाच्या वर्तनामुळे शिक्षकी पेशाला काळीमा
शेवटी आपल्यावर होत असलेला अन्याय या पीडित मुलीला सहन झाला नाही आणि तिने थेट सेलू पोलीस ठाणे गाठलं. पीडितेच्या तक्रारीवरुन संतोष मलसटवाड, नितीन परदेशी, एक अनोळखी व्यक्ती आणि एका अल्पवयीनवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune crime news | कोंढवा परिसरात धक्कादायक घटना; डिलिव्हरी बॉयकडून दिवसाढवळ्या तरुणीवर अत्याचार
विशेष म्हणजे या आरोपींपैकी एक हा पेशाने शिक्षक आहे आणि याच शिक्षकाने पीडित तरुणीचे चोरून व्हिडिओ काढले आणि सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझ्या घरच्यांना ते व्हिडिओ दाखवून तुझी बदनामी करतो अशी धमकी देखील दिली. त्यामुळे शिक्षकाच्या या वर्तनामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा दुरुपयोग करून अशा प्रकारचा गुन्हा घडण्याची परभणी जिल्ह्यात पहिलीच घटना असल्याने जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात आहे.

