Ahilyanagar 23 Year Old Girl Commits Suicide : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, अहिल्यानगरमधील भिंगार शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचं आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीनं आत्महत्या केली आहे.
‘हे लग्न होऊ देणार नाही’
मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक अशोक आव्हाड (रा. माणिकदौंडी रस्ता, पाथर्डी) याने सप्टेंबर 2024 पासून सप्टेंबर 2025 या कालावधीत लग्नाचे खोटे आमिष दाखवत तरुणीशी जवळीक निर्माण केली. या काळात त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाची वेळ आल्यावर दीपकने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान दीपकची बहीण, तसेच ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शिरसाठ आणि बाबूजी नाकाडे (दोघे रा. पाथर्डी) यांनी देखील ‘हे लग्न होऊ देणार नाही’ असं म्हणत तरुणीचा मानसिक छळ सुरू केला. सततच्या या शारीरिक व मानसिक त्रासामुळे संतप्त व हतबल झालेल्या तरुणीने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला.
Shakti Cyclone in Arabian Sea : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; पालघरसह ‘या’ शहरांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
ही घटना उघडकीस आल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आरोपी दीपक आव्हाड, त्याची बहीण, ज्ञानेश्वर शिरसाठ आणि बाबूजी नाकाडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत. परिसरात या घटनेबाबत संताप व्यक्त होत असून, ‘लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी’, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Nashik Crime : कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पोलिस स्टेशनवर दगडफेक, गाडीच्या काचाही फोडल्या, प्रकरण काय?
एसटी ड्रायव्हरने बसमध्येच आपलं आयुष्य संपवलं
राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर बसस्थानकात काल गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. सुरेश चंद्रभान धामोरे (वय 54, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) या एसटी बसचालकानं स्वतःच्या ताब्यातील बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. धामोरे यांच्याविरोधात 1 ऑक्टोबर बुधवारी रोजी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

