Beed News : दसऱ्याच्या दिवशी बारामतीमधील गावात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुण लेकाच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घराशेजारीच तरुणाचा दुर्दैवी अंत
बारामती तालुक्यातील तरडोली गावातील तुकाई नगर वस्तीत आज गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरगुती पाण्याची मोटर जोडत असताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.
Buldhana News : विवाहिता चिमुकलीसोबत रात्री घराबाहेर, दोन दिवस शोधाशोध; नंतर नदीपात्रात माय-लेकींची बॉडी, भयंकर घटनेने कुटुंबाला धक्का
बाप-लेकाला विजेचा झटका, दसऱ्याला अनर्थ घडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तरडोली गावच्या हद्दीत ही घटना घडली. पवारवाडी ते लोणी भापकरकडे जाणाऱ्या मार्गावर तुकाई नगरवस्तीत ही दुर्घटना घडली. शेतातील घराजवळ बोरवेलची मोटर जोडत असताना तरुणासोबत हा अपघात घडला. या घटनेत मेंढपाळ व्यवसाय करणारा युवक तात्यासो मासाळ आणि त्याचे वडील संपत खंडू मासाळ हे दोघे जण पिण्याच्या पाण्याची बोरवेलला असलेली मोटर सुरू करत होते. यावेळी ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास गेला…शेतकरी हतबल, सरकारकडे काय केली मागणी?
येथील बोरवेलच्या ठिकाणी असलेल्या वायरची जोड देत असताना हातातील पक्कडला विजेचा शॉक लागून हा अपघात झाला. दोघांना विजेचा धक्का लागला. मात्र यावेळी बाप-लेकापैकी तरुण मुलाचा मृत्यू झाला. वडील तात्यासो संपत मासाळ यात थोडक्यात बचावले. या घटनेप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, बारामती शहरात रस्ते अपघात थांबायचं नाव घेत नाही. दोन महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि दोन लेकींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरापूर्वी सायकलवरुन जाणाऱ्या एका 75 वर्षीय व्यक्तीला डंपरने धडक दिली. यात डंपरखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला होता. शहरात अपघातामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे.

