Washim Samruddhi Highway Accident : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, वाशिममधील कारंजाजवळ ट्रकचा आणि बोलेरो वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्र. CG 08 AV 0575 हा संभाजीनगर ते भंडारा टमाट्याचे कॅरेट घेऊन जात असताना चँनल क्रमांक 213.200 येथे ट्रक चालक रिझवान शेख (वय 50) याने त्याच्या ट्रकसमोर भाजीपाला घेऊन जात असलेल्या बोलेरो क्र. MH 44 U 1883 ला मागून धडक दिली. बोलेरोला मागून धडक लागल्यामुळे सदर वाहन समोर चालत असलेल्या ट्रक क्रमांक CG 07 CH 7755 चा मागील दोन्ही टायरच्या आत घुसले. यामध्ये बोलेरोमधील दोघांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये बोलेरो फसल्याने पिकअपला QRVच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढलं असता बोलेरोमध्ये असलेले चालक व क्लिनर यांना डॉक्टरांनी जागेवरच मृत झालं म्हणून घोषित केलं.
तीन महिन्यांपूर्वी भाच्याला वाचवलं, आता मामाला गमवावा लागला जीव; धारदार हत्याराने वार करत खून, सांगलीत खळबळ
दोन्ही मृतकांची अद्याप ओळख पटली नसून त्यांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम येथे पाठवण्यात आले असून पोलिस ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अपघातातील ट्रकचा चालक शेख रिजवान हा सुध्दा सदर अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शेलुबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ट्रक चालक दिलीप यादव याला ट्रॅकसह पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे पुढील तपासाकरिता नेण्यात आलं असून अपघातग्रस्त बोलेरो व ट्रक क्रेनच्या सहाय्याने रोडाच्या बाजूला करून बॅरिगेट लावण्यात आलं असून वाहतूक सुरळीत चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

