Kopargaon Clash Between Two Groups : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून तब्बल 74 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस कर्मचारी वाद मिटवण्यासाठी गेले असताना, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड, व दगड यांचा वापर करून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी केवळ हाणामारी नाही, तर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
दीड वर्षापूर्वी लग्न, 4 महिन्यांची गोंडस चिमुकली, बँकेचं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं
याप्रकरणी अनिल उर्फ कालुआप्पा आव्हाड, सोनु आव्हाड, अनुप उर्फ आन्या आव्हाड, रोहीत माळी, अवधुत शिंदे, कैलास आव्हाड, विनायक आव्हाड, दत्तु पंडोरे, किरण आव्हाड, अरुण जोशी, राजेंद्र जोशी, शुभम जोशी, मयुर सुपेकर, अजय सुपेकर, अजिंक्य काकडे, निलेश काकडे, अक्षय आंग्रे, राहुल काकडे, संजय उर्फ भैय्या सुपेकर यांच्यासह त्यांच्या मंडळातील 45 ते 55 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1), 132, 121(1), 49, 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2),सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3), 135 व सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रभारी मुख्यध्यापकाचा पहिलीच्या चिमुकलीवर अत्याचार, डोंबिवलीत संतापजनक प्रकार
या आरोपींमध्ये अनिल उर्फ कालु आव्हाड, हे कोपरगाव नगरपरिषदेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे. तर अरुण जोशी हे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहायक आहे तर अक्षय आंग्रे आमदार काळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहे. यापैकी अनिल आव्हाड आणि अक्षय आंग्रे यांच्यासह दोन्ही गटातील 16 जण अटकेत असून अरुण जोशी यांच्यासह इतर आरोपी फरार आहे. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान अटक असलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

