• Wed. Mar 11th, 2026

    नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    नंदुरबारमध्ये वातावरण तापलं आहे. एका आदिवासी तरुणाच्या हत्या प्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. पण या मूक मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंसक वळण लागलं. त्यामुळे मोठा गदारोळ झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नंदुरबार : नंदुरबारमधून मोठी बातमी समोर येत आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली. यावेळी गर्दीला पांगण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. पण यावेळी काही आक्रमक आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली. यामुळे परिसरातील वातावरण तापलं आहे. खरंतर नंदुरबारमध्ये आज आदिवासी समाजाच्या एका तरुणाच्या खून प्रकरणात शहरात बंदची हाक देण्यात आली. या खूप प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पण हा मोर्चा अंतिम टप्प्यावर असताना अचानक मोर्चाला हिंसक वळण लागलं.

    पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या उपद्रव्यांना रोखण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले. पण परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

    (सविस्तर बातमी अपडेट होत आहे)

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा