Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दुर्दैवी घटनेत एका विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. राहुल जाधव नावाचा २८ वर्षीय रिक्षाचालक बाबा पेट्रोल पंपाजवळ बसच्या धडकेत जागीच ठार झाला असून दोन वर्षांपूर्वीच राहुलचा विवाह झाला होता.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राहुल हा रिक्षा चालक असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. त्याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याला एक लहान मुलगा आहे. रांजणगाव शेणपुंजी येथे आई-वडील, पत्नी, लहान मुलासह राहत होता. दरम्यान रविवारी सायंकाळच्या सुमारास राहुल बाबा पेट्रोल पंप येथील महावीर चौकात उभा होता. यावेळी सिडको येथून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या शिवाई बस एम.एच.२०जी.झेड०४९३ मध्यवर्ती बस स्थानकाकडे जात होती. महावीर चौकात आल्यानंतर वळण घेत असताना राहुल याला धडक देत बस खाली चिरडले.
Pune Crime : तिशीतल्या दोघी अन् मायलेकही सापडेनात, पुण्यात एकाच तालुक्यातून 20 दिवसात 6 जण बेपत्ता, कारण…
बसचे चाक राहुलच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या चेहऱ्याचा अक्षरशः चंदामेंदा झाला होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेचे अंमलदार मगरे व माळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. राहुल याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे राहुल याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने टाहो फोडला होता.
दरम्यान, या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी बस चालक संतोष शेवाळे राहणार मुकुंदवाडी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

