• Sat. Aug 15th, 2026

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 19, 2025
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद




सातारा दि. 19 : कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मरळी येथे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ होण्यासाठी व यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री कार्यालयात कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षी झालेल्या डोंगरी महोत्सवापेक्षा या वर्षीच्या डोंगरी महोत्सवाचे स्वरुप मोठे असले पाहिजे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले या वर्षीचा डोंगरी महोत्सव पाच दिवसांचा असणार आहे. यामध्ये बोट, घोडेसवारी, फनफेर, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. डोंगरी महोत्सवात कृषी विभागाने शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञानाची माहिती मिळेल यासाठी विविध स्टॉल उभारावेत.

डोंगरी महोत्सवात ड्रोन, लेझर शो बरोबर हेलीकॉप्टर सफारीचेही आयोजन करावे. मागील डोंगरी महोत्सवात नागरिकांना ज्या गोष्टी आवडल्यात त्या जास्तीच्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  असेही त्यांनी सांगितले.

0000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed