• Sun. Jul 5th, 2026

    छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 19, 2025
    छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी – महासंवाद





    सातारा दि. 19 : छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची

    पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पहाणी. यावेळी त्यांनी कामात येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या.

    पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष राकडे आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. देसाई यांनी प्रारंभी महाविद्यालयाचा आराखड्याची पहाणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे 100 विद्यार्थी प्रवेश व 500 रुग्ण खाटांचे आहे. महाविद्यालयाच्या कामाला गती मिळण्यासाठी प्रलंबित देयक अदा करण्याबाबत पाठपुरवा केला जाईल. तसेच हे महाविद्यलाय पूर्ण होण्यात काही अडचणी येत असतील तर पालकमंत्री म्हणून त्या दूर केल्या जातील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाहणी प्रसंगी सांगितले.







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed