Latur RTI Activist Kill: गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन पेटलेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यामध्ये एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
महिलेवरही चाकूने वार, गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरु
हा वाद सोडविण्यास गेलेल्या कारमधील एका महिलेच्याही छाती व पाठीवर चाकूचे वार केले गेले. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (17 सप्टेंबर) उत्तरररात्री पावणे एक वाजेच्या सुमारास लातूरच्या बाह्यवळण रस्त्यावरील वस्ताद लहुजी साळवे चौकात खाडगाव स्मशानभूमीजवळ घडल्याची माहिती आहे.
नऊ महिने पोटात वाढवलं, तीन वर्ष सांभाळलं अन् मग लिव्ह-इन पार्टनरसाठी लेकीला संपवलं, थरारक घटना
चाकूने सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू
अनमोल अनिल केवटे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर), असे चाकूने भोसकल्याने मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांच्यासोबत असलेली सोनाली भोसले (वय 40, रा. अंत्रोली, ता. जि. सोलापूर) ही महिला छाती व पाठीवर चाकूचे वार झाल्याने गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही तासातच एक आरोपी ताब्यात
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदरील गुन्ह्यात वापरलेली क्रुझर गाडी पोलिसांनी जप्त केली असून अन्य तीन आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. 24 वर्षीय तरुणाला अहमदपूर येथून अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदरील घटनेचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर जमादार राहुल सोनकांबळे जमादार बालाजी कुटवाड यासह अन्न लोक करत आहेत.

