OBC Reservation Suicide : मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण दिल्याने बीडमधील ओबीसी तरुणाने आत्महत्या केली आहे. एकीकडे मुलगी पोलिस भरतीची तयारी करतेय, तर दुसरीकडे वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
घरातील कर्ता पुरूष गेल्यानं कुटुंबाचे हाल होतील, अशी हळहळ कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आता इथून पुढे आमची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो. ‘माझे वडील गेले पण, आमची जबाबदारी कोण घेणार?’, असा भावनिक सवाल गोरक्षक देवडकर यांच्या मुलीनं केला आहे. सरकारने यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी, मागणी तिने केली आहे.
आरक्षणाबाबत मोठी बातमी: सरकारविरोधात दोन मोर्चे काढणार, काँग्रेस नेत्याकडून तारखेची घोषणा, भुजबळांनाही जाहीर ऑफर
चिठ्ठी लिहित वडिलांचं टोकाचं पाऊल
दरम्यान, लातूरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (वय 32) या युवकाने आत्महत्या केली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी विजेच्या करंटचा धक्का घेत जीवन संपवलं. जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं मृत्यूआधी सांगितलं आहे.
सर्वात मोठी बातमी! 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
शिवाजी मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं. ‘माझे दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवत आहे. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही. हे सरकार प्रमाणपत्र देत नाही. म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.’ असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

