Dharashiv News: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी बंजारा समाज जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे निवेदने देऊन मागणी करत आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शहरातील नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण या 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्र्यांना उद्देशून चिठ्ठी लिहिली आहे. बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटच्या तरतुदीनुसार एसटी प्रवर्ग म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा, अशी मागणी या चिठ्ठीतून पवन चव्हाण यांनी केली.
Prakash Mahajan : मी असलो-नसलो तरी पक्षावर परिणाम नाही; प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी, एकच वाईट वाटतं की अमित ठाकरेंना…
पवन चव्हाण हे बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. गेल्या आठ दिवसांमध्ये बंजारा समाजाच्या झालेल्या आंदोलनामध्ये पवन चव्हाण अग्रेसर असायचे. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी आता त्यांनी थेट मृत्यूला कवटाळले. पवन चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे असे समजतात बंजारा समाजातील विविध लोकांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले. या प्रकरणाचा तपास मुरूम पोलीस करत आहेत.
ओबीसी आरक्षणासाठीही आत्महत्येची घटना
‘मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसींचे आरक्षण संपवले आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाचे कसे,’ अशी चिंता व्यक्त करून व घोषणा देऊन बुधवारी सायंकाळी रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड (वय ३५) याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याने ओबसींच्या आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करणारी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. भरत महादेव कराड रिक्षाचालक होता. कराड याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

