• Tue. Jun 9th, 2026

    दारूच्या नशेत झिंगलेल्या तरुणींचा भररस्त्यात राडा: एकमेकींना मारहाण, हॉटेलचीही तोडफोड; VIDEO व्हायरल

    दारूच्या नशेत झिंगलेल्या तरुणींचा भररस्त्यात राडा: एकमेकींना मारहाण, हॉटेलचीही तोडफोड; VIDEO व्हायरल

    Crime News: मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. तसंच या तरुणींनी जालना रोडवर एका हॉटेलची तोडफोड केली आणि एकमेकींना मारहाण देखील केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दारूच्या नशेत झिंगलेल्या तरुणींचा भररस्त्यात राडा: एकमेकींना मारहाण, हॉटेलचीही तोडफोड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: दारूच्या नशेत तर्र झालेल्या दोन तरुणींनी भररस्त्यात राडा केल्याची घटना घडली आहे. या तरुणींनी शिवीगाळ करत एका हॉटेलची तोडफोड केली. एवढेच नाही तर एकमेकींना मारहाण केली. पोलिसांनी सदर तरुणींना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार शहरातील जालना रोडवर शुक्रवारी मध्यरात्री घडला. या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरती प्रकाश कांबळे (वय 30, राहणार उस्मानपुरा पीर बाजार जवळ) आणि प्रतीक्षा बाळासाहेब भादवे (वय 25 राहणार उस्मानपुरा पीर बाजार) असं दारूच्या नशेत राडा करणाऱ्या तरुणींची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिकाने सांगितलं की, शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथे दोन तरुणी आल्या. या दोन्ही तरुणी दारूच्या नशेत तर्र झालेल्या होत्या. या तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर जवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या दुकानाजवळ जाऊन गोंधळ घालत दुकानाच्या काचांची तोडफोड केली. त्यानंतर दोन्ही तरुणी मुख्य रस्त्यावर गेल्या. इथे दोघींनी एकमेकींना शिवीगाळ करत हाणामारी करायला सुरुवात केली. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता.

    दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघींना ताब्यात घेत असताना सदर तरुणींनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. समजूत काढत पोलिसांनी तरुणींना घाटी रुग्णालयात मेडिकलसाठी दाखल केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी दोन्ही तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार घोडके करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा