Beed Dy Sarpanch Govind Barge Ends Life In Solapur : गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली
पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात
गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून या प्रकरणी वैराग, ता बार्शी जि सोलापूर, पोलिसांनी पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैराग पोलीस पूजाची कसून चौकशी करत आहेत. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलीस तपास जोरात सुरु आहे.
Crime News : शिक्षिकेने ओढणी झटकत इशारा केला, जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक रंगेहाथ सापडला, कारण ठरली…
तुझ्यासारखे चार आहेत
पोलिसांच्या ताब्यात असलेली संशयित आरोपी पूजा गायकवाडचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती ब्रेकअपबद्दल बोलताना दिसत आहे. मला ब्रेकअप करायचं आहे, असं ती म्हणताच, तो विचारतो की तुझ्याकडे काय आहे, मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है… तेरे पास क्या है, यावर ती ‘माझ्याकडे तुझ्यासारखे चार आहेत’, असं रीलमध्ये बोलताना दिसते. बर्गे यांनी आत्महत्या केल्यानंतर पूजाचा हा जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर सोशल मीडियात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
Solapur Upsarpanch Case : अवघ्या 21 वर्षांच्या पूजाने गोविंदसोबत… मयत माजी उपसरपंचाच्या मित्राचे धक्कादायक गौप्यस्फोट
धाराशिव जिल्ह्यातील त्या कलाकेंद्रात नर्तकी होती
धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील तुळजाई कला केंद्रावर पूजा गायकवाड ही नर्तकी होती. गोविंद यांच्या आत्महत्या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई कलाकेंद्र चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. यात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण बर्गे हे आत्महत्येपूर्वी तिथे गेले होते. पण तिथे नेमके काय झाले हे गुलदस्त्यात आहे. गेले अनेक दिवस ते कला केंद्रावर येत असल्याने हे कला केंद्र व तिथले काही जण चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

