• Sat. Mar 14th, 2026
    निलेश चव्हाण पुण्यातून नेपाळला, चार राज्य फिरला, एका गोष्टीने अडकला, १० दिवसांनी कसा आला ताब्यात

    Nilesh Chavan Arrested : पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक ठिकाणी तपास केला, अखेर तो नेपाळच्या सीमेवर सापडला.

    वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून अटक

    पुणे : वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरे, दीर, नणंद अटकेत आहेत. तर या कुटुंबियांचा जवळचा व्यक्ती असलेला निलेश चव्हाण हा वैष्णवीच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी फरार झाला. मागील १० दिवसांपासून पोलीस फरार निलेश चव्हाणचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत महाराष्ट्रासह इतर राज्यभरात विविध ठिकाणी फिरत होता. अखेर पोलिसांनी ३० मे रोजी ज्याला नेपाळ सीमेवरुन ताब्यात घेतलं.

    निलेशवर वैष्णवीच्या मुलाला जबरदस्तीने स्वत:जवळ ठेवणं, तिच्या कुटुंबियांना धमकी देणं, शस्त्र दाखवणं असे आरोप आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेशने काही दिवस त्यांच्याकडे ठेवलं होतं. याची माहिती वैष्णवीच्या आई-वडिलांना मिळाली. ते बाळाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण निलेशने त्यांना धमकी देत बाळ त्यांच्याकडे सोपवलं नव्हतं. पण नंतर अटकेच्या कारवाईला घाबरत निलेश फरार झाला. त्याला शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची सहा पथकं आणि पुणे पोलिसांची तीन पथकं, सायबर सेल पोलीस, गुन्हे शाखेचे युनिट त्याचा शोध घेत होतं.
    Hingoli News : अंगणात खेळताना चिमुकली दिसेनाशी, गावभर शोधलं नंतर घराशेजारीच… लेकीच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

    कसा, कुठे फिरत होता निलेश चव्हाण?

    निलेश चव्हाण पुण्यातून फरार होत मुंबईत गेला. नंतर रायगडमधील कर्जतमध्ये गेला. त्यापुढे दिल्लीत पोहोचला. नंतर दिल्लीतून तो गोरखपूर आणि पुढे उत्तर प्रदेशातील सौनौली इथे आला. नंतर काठमांडूतून नेपाळच्या सीमेवर मागावर असलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
    Maharashtra TimesVaishnavi Hagawane : वारजेत 1BHK फ्लॅट भाड्याने घेतला अन् दुसऱ्याच दिवशी… हगवणे बंधूंच्या ‘रेड कार्पेट’चा आणखी एक कारनामा समोर
    महत्त्वाची बाब म्हणजे निलेश चव्हाण भारतीय सीम कार्ड वापरत नव्हता. तो नेपाळचं सीम कार्ड वापरुन तिथलंच इंटरनेट वापरत होता. त्याशिवाय तो गुगलपे, एटीएम या हेदेखील वापरत नव्हता.

    हुंडा घेणारा कळवा, ५ हजार रुपये मिळवा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नवी मुंबईत पोस्टरबाजी

    पोलिसांनी निलेश चव्हाणला कसं पकडलं?

    पुणे, पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखेच्या पोलिसांसह सायबर पोलिसांचं पथकही निलेशच्या मागावर होतं. २५ मे रोजी तांत्रिक तपासात निलेश दिल्ली ते गोरखपूर या मार्गाने बसने प्रवास करत असल्याचं लोकेशन ट्रेस झालं. तो गोरखपूरला उतरला. सीसीटीव्हीमध्ये तो प्रवास करत असलेली बस दिसली होती. त्यामुळे पुढे तो गोरखपूरमध्ये नेमका कुठे गेला याचा शोध सुरू झाला. दोन ते तीन दिवसांनी तो नेपाळला गेल्याचं शेकडो सीसीटीव्ही तपासल्यावर समोर आलं. ३० मे रोजी सौनौली इथे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा