Pune News : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांंमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच सिंहगड रोडवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
शहरात अल्पवयीन मुलीचा सलूनमध्ये हेअर स्पाच्या नावाखाली विनयभंग झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. ही घटना तीन सप्टेंबरला दुपारी साडेअकराच्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Pune Crime : आयुष कोमकर क्लासमधून आलेला, घराच्या बेसमेंटमध्ये…, उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितला घटनेचा थरार
या प्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उमर युनूस सलमानी (वय १९, रा. वडगाव बु. मूळ गाव बिजनौर, उत्तर प्रदेश) याच्यावर भारतीय न्याय संहिता, तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात टोळी युद्धाचा भडका, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार यांची चौदा वर्षीय मुलगी केसांच्या स्पासाठी सलूनमध्ये गेली होती. स्पामध्ये मुलीचा हेड मसाज चालू असताना आरोपीने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. या घटनेमुळे मुलगी घाबरली व तिने लगेच पालकांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

