Govind Komkar Murder Case : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. गेल्या वर्षी गँगस्टर बंडू आंदेकरचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येला एक वर्ष होताच बदला म्हणून मुख्य आरोपी कोमकरच्या मुलाला काल संपवलं. आरोपींनी डीजेवर एक गाणं लावल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलेलं?
नाना पेठेमध्ये रात्री पावणे आठच्या सुमारास गोविंद हा आपल्या क्लासवरून आला होता. त्यावेळी तो मित्रासोबत गेटवर उभा होता, तिथे दोन हल्लेखोर आले आणि त्यांनी गोविंदवर गोळ्या घातल्या. गोळी लागताच गोविंद हा खाली पाडला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला होता. आरोपींनी त्याला मारताना तिथे 1997 साली आलेल्या संजय दत्त याच्या ‘महांता’ चित्रपटातील ‘टपका रे टपका एक और टपका दो मे से एक गया एक का ये मटका तिसरा है टपका’ हे गाणं लावत कोमकरचा खून केल्याची धक्कादायक माहिती समजत आहे.
Pune Crime : आयुष कोमकर क्लासमधून आलेला, घराच्या बेसमेंटमध्ये…, उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितला घटनेचा थरार
मामा-भाचे गेले
वनराज आंदेकर खून प्रकरणात गोविंद कोमकरचा पिता गणेश कोमकर हा मुख्य आरोपी आहे. वनराज यांच्या सख्ख्या बहिणीचा विवाह गणेश कोमकरसोबत झाला होता. नाना पेठेमधील एक दुकानावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्या दुकानावर वनराज यांनी आपली पॉवर वापरत महापालिकेकडून कारवाई करण्यासाठी सांगितल्याच राग कोमकरच्या मनात होता. या घरगुती वादातून गणेश कोमकरने सुपारी देत वनराज यांना संपवलं होतं. या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने गणेश कोमकरच्या २० वर्षीय मुलाला संपवलं आहे. आता या मर्डरमुळे गणेश कोमकर आणि आंदेकर यांच्यातील टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

