Mumbai Rain Update: मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. जणूकाही गणपती विसर्जनात स्वत: वरुणराजाने हजेरी लावली आहे, असं दिसत आहे. या मुसळधार पावसाच्या सरींमध्येही गणेश भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
मुंबईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु
आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर आकाशातही काळे ढग दाटून आले आहे. जणूकाही बाप्पााला निरोप देण्यासाठी स्वत: वरुणराजा आला आहे, असं दृश्य मुंबईत पाहायला मिळत आहे.
मुंबईतील ८४ रस्ते पूर्णपणे बंद; गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 4000 वाहतूक पोलिस बंदोबस्त, कसे असेल नियोजन?
हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी
मुंबईसाठी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज शनिवारी मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दक्षिण मुंबईत पावसाची संततधार कायम असेल. तर, मुंबई उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगडलाही पावसाचा अलर्ट, मुसधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचीही शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहेत. तर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे घाट परिसरातही जोरदार पाऊस बरसणार
त्याशिवाय, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापुरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर, पुढील तीन दिवस पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

