Nandurbar News : भाजप आमदार विजयकुमार गावित आणि शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद थांबत नाही, तोच महायुतीतील वाद समोर आला आहे.
भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद थांबत नाही, तोच महायुतीतील वाद बाहेर येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने तळोदा व शहादा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजपला डिवचत नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेले भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली. नंदुरबार येथील शिवसेनेचे युवा नेते संदीप चौधरी, माजी नगरसेवक प्रमोद बोडके व माजी नगरसेवक जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
Eid E Milad 2025 : मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल, मुस्लिम संघटनांच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचाही प्रवेश
सध्या भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.मंजुळाताई पाडवी, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, यांच्यासह राष्ट्रवादीचे रविंद्र नाईक (तालुका अध्यक्ष नंदुरबार आदिवासी सेल), जंगलसिंह पाडवी (तालुकाध्यक्ष तळोदा), शिवाजी वसावे (तालुकाध्यक्ष अक्कलकुवा), गुलाबसिंग पाडवी (जिल्हा उपाध्यक्ष), अनिल पाडवी (तालुका अध्यक्ष नवापूर), विकास वसावे (जिल्हा सचिव नंदुरबार) रीना वसावे (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील लोणखेडा व लोय ग्रामपंचायत, तळोदा तालुक्यातील लाखापुर, चिनोदा ग्रामपंचायत, तसेच नवापूर तालुक्यातील खेरवा ग्रामपंचायत येथील आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : सरकारनं टायमिंग साधलं !, जरांगे ट्रॅपमध्ये अडकले ?
Maharashtra Politics : राजकारणाला कंटाळून एकनाथ शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, भाजपने डाव साधला, तिघांचा पक्षप्रवेश
काँग्रेसला दिला झटका
नंदुरबार येथील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नटावदकर परिवारातील सदस्या तथा काँग्रेसच्या नेत्या डॉ.समिधा नटावदकर यांनीही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यापुढे देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीत अनेक पक्षाचे कार्यकर्ते येणार असून काँग्रेससह विरोधी पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षाच्या झेंडा लावण्यासाठी सुद्धा शिल्लक राहणार नाही असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला.

