Manoj Jarange Health Update: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सतत उपोषणावर बसल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आधीच खालावली होती. त्यात त्यांनी मुंबईत पाच दिवस उपोषण केलं, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाला आहे.
सातत्याने उपोषण केल्याने प्रकृतीवर वाईट परिणाम
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी होत होती. मात्र, अनेक कारणांमुळे हे आरक्षण मिळू शकले नाही. दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान लाठीचार्जही झाला. तेव्हापासून मनोज जरांगे सातत्याने उपोषण आंदोलन करून आरक्षण मिळावे ही मागणी करत होते. सातत्याने उपोषण केल्यामुळे जरांगेंच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, माझा जीव गेला तरी चालेल, मात्र मी आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका मनोज जारांगे यांनी घेतली होती.
Maratha Protest: आशा-निराशेचा हिंदोळा, विजयाच्या गुलालाची उधळण; ‘पाटील पाटील’ च्या घोषणांनी आझाद मैदान दणाणला
मुंबईतील आंदोलन उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. यांच्यावर उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून सातत्याने उपोषण करून मनोज जरांगे यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम झाला होता. मुंबईत झालेल्या मोर्चासाठी दोन दिवस प्रवास त्यानंतर पाच दिवस उपोषण केल्याने मनोज जरांगे यांची तब्येत आणखी घालवली आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासण्या करून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे यांना आणखी 15 दिवस आरामाची गरज असल्याचं डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितलं आहे.

