Chhatrapati Sambhajinagar Crime : रस्त्यात हात पकडून अल्पवयीन मुलाला धमकी दिली आणि पडक्या घराच्या मागे नेऊन चाकूचा धाक दाखवत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 13 वर्षीय साहिल (नाव काल्पनिक आहे) हा कुटुंबासह जिन्सी भागात राहतो. 31 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास साहिलच्या कुटुंबीयांनी त्याला किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी सांगितले. घरातून पैसे घेऊन साहिल जवळच असलेल्या दुकानात पायी जात होता.
चाकूच्या धाकाने अनैसर्गिक अत्याचार
याच वेळी रस्त्यात थांबलेला आरोपी वसीम शेख याने साहिलला अडवलं. त्याचा हात पकडून त्याला धमकी दिली. रस्त्यातच एका पडक्या घराच्या मागे नेऊन साहिलला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर साहिलवर अनैसर्गिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या साहिलने घरी पळत जात हा धक्कादायक प्रकार सांगितला.
Navya Malik : ड्रग्ज तस्करीचं मोठं रॅकेट सापडलं, मुंबईतून इंटिरिअर डिझायनर तरुणीला अटक, 36 जणांसोबत…
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ जिन्सी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार सांगितला. या घटनेत मुलावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
भुजबळांवर टीका, ओबीसीतून आरक्षण शक्य? मराठा अभ्यासक योगेश केदार थेट बोलले
Akola Crime : माझे मिस्टर घरी नाहीयेत, दुपारी या! 52 वर्षीय ज्वेलरला लताने घरी बोलावलं, एवढ्यात नवरा पोहोचला अन्…
वसीम शेख नशेच्या आहारी
मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणारा वसीम शेख हा नशेच्या प्रचंड आहारी गेलेला आहे. त्याच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्ह्याची नोंद आहे. नशेमध्ये तो गुन्हेगारी कारवाई करत असतो. या घटनेमुळे शहरातील नशेखोर, नशा विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. आता तरी पोलीस यावर आळा घालणार का? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहे.

