• Fri. Mar 6th, 2026

    ‘शरद पवारांनी वाटोळं केलं’, लेकीसमोर आंदोलकांच्या घोषणा, गाडीवर बॉटल फेकल्या, गर्दीत घेरलं; आंदोलनस्थळी काय काय घडलं?

    ByMH LIVE NEWS

    Sep 1, 2025
    ‘शरद पवारांनी वाटोळं केलं’, लेकीसमोर आंदोलकांच्या घोषणा, गाडीवर बॉटल फेकल्या, गर्दीत घेरलं; आंदोलनस्थळी काय काय घडलं?
    मुंबई 
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाल्या. त्यांनी आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जात जरांगेंची विचारपूस केली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे मनोज जरांगे उपोषणस्थळी झोपलेले होते. सुप्रिया सुळे यांनी यावेळी मंचावर असलेल्या मराठा समान्वयकांशी चर्चा केली. तसेच अंतरवलीच्या सरपंचांनी मनोज जरांगे यांना उठवलं. यावेळी मनोज जरांगे बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करतात. त्यानंतर सुप्रिया सुळे मंचावरुन खाली उतरतात.सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतात. यानंतर ते परतीला जात असताना त्यांच्या गाडीजवळ आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. “शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं”, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी यावेळी केली. यावेळी आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. या भर गर्दीत काही आंदोलकांनी सु्प्रिया सुळे यांना गाडीत बसण्यासाठी प्रयत्न केले. इतर आंदोलकांनी आक्रमक आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक आंदोलन ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

    आंदोलकांचा इतका मोठा रोष असताना सुप्रिया सुळे यांनी संयम ढळू दिला नाही. त्या चारही बाजूने आंदोलकांना हात जोडून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग नव्हता. त्या स्मितहास्य करुन आंदोलकांना नमस्कार करताना दिसत होत्या. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना सुखरुप गाडीत बसवलं. पण गाडीत बसवल्यानंतर काही आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यांनी चारही बाजूने गाडीला घेरलं. ते जोरदार घोषणाबाजी करत राहिले.

    जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंची गाडी मराठा बांधवांनी अडवली, पवारांच्या नावाने घोषणाबाजी!

    यावेळी काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी जावू द्यावी यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने सुप्रिया सुळे यांची गाडी जाण्यासाठी मार्ग निघाला. सुप्रिया सुळे यांची गाडी जसजसी पुढे जात होती तसतसे आंदोलक गाडीच्या मागे पळत होते. यावेळी आक्रमक आंदोलकांनी सुप्रिय सुळे यांच्या गाडीच्या दिशेला पाण्याच्या बाटल्यादेखील फेकल्या. आंदोलकांचं हे सर्व रुप धक्कादायक होतं. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलक शांत होते. पण आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed