Manoj Jarange Patil: पंढरपूरमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण केला आहे. राजकीय फायद्यासाठी ओबीसी आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
“सध्या सुरू असलेले आंदोलन हे मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम आहे. राजकीय आरक्षण मिळवण्याची ही धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. EWS आरक्षण खरे मराठ्यांचे आरक्षण आहे. मराठे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. मात्र गावच्या सरपंचपदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून पूर्वी दिलेल्या एसईबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे,” असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Ajit Pawar : अजित पवार सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला, पडद्यामागच्या हालचाली वाढल्या
मराठा आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणं अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील. सगेसोयरेबाबत अध्यादेशही निघालेला आहे आणि आपल्या पितृसत्ताक समाजाच्या नियमानुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात आणि अशा सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकाला दाखला मिळतो, त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील दहा जणांना याचा फायदा होतो, याचा विचार करता लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे,” असा दावा पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे कधीही खोटे बोलत नाहीत. मात्र काही लोक नेहमीच खोटं बोल पण रेटून बोल, असं करत असल्याचा टोला पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला.

