• Fri. Jun 19th, 2026
    सरकारचं दुर्लक्ष, मनोज जरांगे उद्यापासून पाणीही बंद करणार; पत्रकार परिषदेत दिली माहिती

    Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे, त्यामुळे सरकारवर दबाव वाढल्याचे चित्र आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा आरक्षण द्यावे, या मागणीवर ते ठाम आहेत. यासाठी मराठ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात एल्गार पुकारला आहे. आज मनोज जरांगे पाटील या लढ्याचं नेतृत्व करत आहेत आणि ते आता आणखी आक्रमक झाले आहेत. गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. तर उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण आणखी कडक करणार असल्याचा इशारा आज त्यांनी दिला आहे.

    बातमी अपडेट होत आहे

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा