Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी वाढवून मिळालीये. यानंतर पुन्हा एकदा सरकारने आरक्षण देऊन टाकण्याची मागणी जरांगे यांनी केली. आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, ‘सरकारने काय केलं ते मला माहीत नाही. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे, हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने असली डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं. मराठ्यांचं मनं जिंकणं गरजेचं आहे. मी सकाळीसुद्धा तेच सांगितलं आणि आता सुद्धा तेच सांगतोय. सरकारला आता अशी योग्य संधी आहे, गोरगरिबांची मनं जिंकण्याची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठे विसरणार नाहीत, जर त्यांनी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिलं. माझा मरेपर्यंत गरीब मराठा विसरणार नाही’, असं मनोज जरांगे म्हणाले.
‘तर तुमच्या सभेवेळी पाईपलाईन बंद करु’, मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
‘सरकारच्या हातात आहे, आंदोलन मोडायचं की, मला गोळ्या घालायचे. जेवणाचे हॉटेल बंद आहे. संडासांना कुलूप लावल्याने आंदोलक सीएसएमटी स्टेशनवर गेले. तुम्ही संडास वगैरे ठेवत नाही, पाणी देत नाही, मग इंग्रजांपेक्षा मोठे आहेत. मराठे घुसले आणि जाम केलं. सरकारने आठमुठेपणा न करता सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही पण केलं. सरकारला परिस्थिती जाणून घेणं गरजेचं होतं. एकेक दिवसाची रडक्यासारखी परवानगी देतात. तुम्ही ज्यावेळी तिकडे येता त्यावेळी आम्ही असेच करतो का? तुम्ही इकडे त्रास दिला तर तुम्ही तिकडे आल्यावर आम्ही त्रास देणार आहे. बदला होणारच आहे’, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय.
Akola News: मजुरी करुन परतताना माय-लेकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, मुलीला वाचवलं, आई डोळ्यादेखत दिसेनाशी झाली
मी मराठा समाजासाठी बलिदान देण्यासाठी तयार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘माझं बलिदान गेल्यानंतर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या’, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘पण तुम्ही त्यांना इथं त्रास देऊ नका’, असं जरांगे म्हणाले.

