Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होता. या आरोपांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सरकारमध्ये एकजूट असल्याचा दावा केला आहे. गणेशोत्सवात कोणताही व्यत्यय येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक आहोत. एकनाथ शिंदे यांनीही असं काही झालं नसल्याचं सांगितलं आहे. कोणीही काडी टाकण्याचा आणि बांबू टाकण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेंसोबत माझे चांगले संबंध आहेत,” असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.
Ratnagiri News : मनसेमधून कट्टर शिलेदाराची हकालपट्टी, राज कठोर होताच भाजपने डाव खेळला, पहिला फोन कोणी फिरवला?
मराठा आंदोलनाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
मनोज जरांगे हे 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणालाही रोखणार नाही. मात्र त्याचवेळी आता हिंदूंचा सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव आहे. या सणात कोणतंही विघ्न येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही मुंबईत पोहोचण्याआधी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मी उपोषणाला बसणारच, असा निर्धार मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारकडून ही कोंडी फोडण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

