नगररचना विभागाच्या कामावर फडणवीस नाराज असून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद आहे का? असा प्रश्न माध्यमांनी बच्चू कडूंना विचारला. त्यावर कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “हो तो आहेच. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याची केंद्रात अधिक ताकद आहे. अजित पवार, एकनाथ शिंदेंची संख्या लोकसभेत कमी आहे. मात्र राष्ट्रवादीचे शप अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. भारतीय जनता पक्षाला संख्याबळाची राज्यात गरज आहे की केंद्रात? उत्तर हे केंद्रात आहे. राज्यात कुणाची गरज नाही. केंद्रात सरकारमधून नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू गेले तर हे दोघे तयार आहे. त्यामुळे काय होणार सांगायची गरज नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘दादागिरी दाखवावी,दादासमोर दादा लावावं की आणखी काही…’
“विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचा आश्वासन दिलं होतं. उपमुख्यमंत्री अजित दादा गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्जमाफीबाबत बोलत आहेत. कर्जमाफी होईल असं वाटतं का? विचारताच बच्चू कडू म्हणाले, अजित दादांनी दादागिरी दाखवली पाहजे. दादा विसरलोच आम्ही. दादा समोर दादा लावावं की आणखी दुसर लावावं हे समजत नाहीये”, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला.
