• Fri. Jul 3rd, 2026

    एकनाथ शिंदे यांच्या रॅलीवेळी शिवसैनिकांचा मोठा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    एकनाथ शिंदे यांच्या रॅलीवेळी शिवसैनिकांचा मोठा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर दौऱ्यावेळी शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला. एकनाथ शिंदे यांची रॅली सुरु असताना शिवसैनिकांमध्ये गोंधळ झाला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी राज्यातील विविध पक्षांमध्ये रोज शेकडो पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही रोज असेच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत. पण असं असताना आज संगमनेरमध्ये एक अनपेक्षित प्रकार समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झाला. यामुळे मोठा राडा झाला. यावेळी पोलिसांना पोलीस बळाचा वापर करावा लागला.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांची आज संगमनेरमध्ये जंगी रॅली निघाली. या रॅलीनंतर त्यांची सभादेखील आयोजित करण्यात आली. पण त्यांच्या रॅलीदरम्यान काही शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला. विशेष म्हणजे यावेळी गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

    या घटनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान पोलिसांचं नियोजन कोलमडल्याचं पाहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभास्थळी मंचाजवळ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हा गोंधळ अचानक वाढत गेला. यामुळे यावळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

    या घटनेची दखल शिवसेनेचे मुख्यनेता एकनाथ शिंदे घेतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. या घटनेनंतर अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर एकनाथ शिंदे काही कारवाई करतात का? ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये इतका मोठा गोंधळ का झाला होता? ते देखील अद्याप समजू शकलेलं नाही. पक्षाचे दोन गट आमनेसामने आले होते की, त्यावेळची परिस्थिती वेगळी निर्माण झाली आणि त्यातून गोंधळ उडाला? याबाबतही सविस्तर माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या घटनेचे व्हिडीओ अत्यंत बोलके आहेत. या व्हिडीओत पोलीस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करतानादेखील दिसत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा