• Fri. Aug 7th, 2026
    Pawanraje Nimbalkar : पवनराजे निंबाळकर प्रकरण; आरोपींनी याआधी किती वर्ष तुरुंगवास भोगलेला?

    Pawanraje Nimbalkar Murder Case Court Hearing : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागणार आहे. मात्र, यामधील आरोपींनी काही काळ तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण कोर्ट सुनावणी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : 3 जून 2006 रोजी झालेल्या पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी या दुहेरी हत्याकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी आज 20 जून रोजी होत आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल लागत असल्यानं धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज सुरुवातीला कोर्ट आरोपींच्या दोषसिद्धीबाबत निर्णय देऊन ते दोषी आहेत की निर्दोष हे जाहीर करू शकते. आरोपी दोषी आढळल्यास शिक्षेच्या प्रमाणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्ट आपला अंतिम निर्णय जाहीर करेल.

    कोण किती काळ तुरुंगात राहिलेलं?

    या खटल्याच्या दीर्घ प्रवासात मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांचा सर्वात कमी काळ, म्हणजेच 3 महिने 19 दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत मुक्काम होता. 6 जून 2009 रोजी अटक झाल्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यांत, 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने त्यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गुन्ह्यातील शूटर दिनेश तिवारी हा सर्वाधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिला. 25 मे 2009 रोजी अटक झाल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत न्यायाधीश महाले यांच्या कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला होता. तिवारीने तब्बल 15 वर्ष 11 महिने तुरुंगात काढले, तर दुसरा शूटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात होता. सुनावणी दीर्घकाळ चालल्यामुळे हे दोन्ही शूटर एप्रिल 2025 मध्ये जामिनावर सुटले, तर माफीचा साक्षीदार बनलेला पारसमल जैन 14 वर्ष 6 महिन्यांनंतर बाहेर आला.
    Maharashtra TimesKudal Apla Bazar Mall : दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते थाटात उद्घाटन, काल त्याच मॉलवर FDAची धाड; नेमकं काय घडलं?

    ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

    ‘निश्चितपणे मागच्या 20 वर्षापासून माझं कुटुंब आणि माझ्या वडिलांचे चालक समद काझी यांचं कुटुंब ज्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढा देत आहे, संघर्ष करत आहे आणि अनेक यातना या 20 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सोसलेल्या आहेत, ज्यांच्यामुळे ही वेळ आमच्यावर आली, त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे. आजच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे, आजची तारीख माननीय न्यायालयाने राखीव करून ठेवली होती, निश्चितपणे न्याय देवता न्याय करेल ही अपेक्षा आहे’, असंही ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं आहे.

    3 जून 2006 रोजी काय घडलेलं?

    3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकरांची नवी मुंबईतील कळंबोलीत हत्या झाली होती

    दुचाकीस्वारांनी पवनाराजेंची गाडी अडवून त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता

    पवनराजे आणि ड्रायव्हर समद काझी यांचा जागेवरच मृत्यू झाला होता
    Maharashtra TimesNashik News : 29 जूनला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान, त्याआधी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; असा असेल पालखीचा मार्ग
    माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहेत

    पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी दिल्याचं सीबीआय तपासात समोर आलं होतं

    राजकीय संघर्षामुळे हत्या, असा पाटलांवर आरोप आहे

    डीसीसी बँक आणि होम ट्रेड प्रकरणी पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप केले होते

    2004च्या विधानसभेला पद्मसिंह पाटलांनी पवनराजे निंबाळकरांचा पराभव केला होता

    सीबीआयकडून 2009ला पद्मसिंह पाटलांना अटक झाली होती

    हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह एकूण नऊ आरोपी आहेत

    मुख्य सुत्रधारांपैकी एक पारसमल जैन बनलाय माफीचा साक्षीदार
    Maharashtra TimesPune Crime : होणाऱ्या बायकोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन , सोबत दोन जवळचे मित्र, लोहगडावर केतनच्या मृत्यूआधी काय घडलं? घटनाक्रम समोर

    आरोपी कोण-कोण आहेत?

    पद्मसिंह पाटील
    सतीश मंदाडे
    मोहन शुक्ल
    शशिकांत कुलकर्णी
    कैलाश यादव
    दिनेश तिवारी
    पिंटू सिंग
    छोटे पांडे

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा