• Tue. Mar 10th, 2026

    किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करण्यासाठी व आवश्यक निधी व जागा उपलब्ध करून दिल्या बाबत आ. भीमराव केराम साहेब यांचा किनवट अभिवक्ता संघा-तर्फे जाहीर सत्कार

    ByMH LIVE NEWS

    Aug 23, 2025
    किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करण्यासाठी व आवश्यक निधी व जागा उपलब्ध करून दिल्या बाबत आ. भीमराव केराम साहेब यांचा किनवट अभिवक्ता संघा-तर्फे जाहीर सत्कार

    नांदेड:- हर्षवर्धन कनाके

    येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करून त्यासाठी सतत पाठपुरावा करून आवश्यक निधी व नगर परिषद क्षेत्रातील इमारत तथा जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल किनवट अभिवक्ता संघातर्फे आमदार भिमराव केराम यांचा जाहीर सत्कार सोहळा दिनांक 14 ऑगस्ट रोजी साई वंदना मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

    यावेळी आमदार केराम म्हणाले की, “किनवटसाठी सत्र न्यायालय मंजूर झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना न्यायप्रविष्टतेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यानंतरही प्रवास खूप मोठा असून किनवट जिल्हा निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.”

    त्यांनी स्पष्ट केले की, याआधी किनवटसाठी मंजूर झालेल्या अनेक प्रशासकीय कार्यालये व योजना नांदेड किंवा भोकर येथे वळवल्या गेल्या. “भोकरचे सत्र न्यायालय असो, उड्डाण पूल असो वा सहाय्यक पोलिस अधीक्षक कार्यालय असो – ही कार्यालये किनवटसाठी मंजूर असूनही अन्य ठिकाणी वळवली गेली. आज तीच मंडळी किनवटसाठीच्या श्रेयाचे दावे करीत आहेत. मात्र सत्य हेच की, गेल्या अनेक वर्षांपासून किनवटला न्याय मिळत नव्हता आणि यासाठी मी व स्थानिक जनतेने सातत्याने संघर्ष केला.”

    आमदार केराम यांनी पुढे सांगितले की, आता किनवट व परिसरातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक व प्रशासकीय सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी विधायक पावले उचलण्यात येणार आहेत. “सत्र न्यायालयाच्या स्थापनेनंतर उच्च दर्जाचे शैक्षणिक संस्थान, आरोग्य विषयक सुविधा, प्रशासकीय कार्यालये, तसेच रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक व औद्योगिक प्रकल्प या भागात आणणे हाच माझा पुढील उद्देश आहे. यासाठी मला किनवटच्या सर्व पक्ष, संघटना व नागरिकांची साथ अपेक्षित आहे.”

    या विधानातून केराम यांनी किनवट मतदारसंघाच्या भविष्यासाठी एक विधायक व आशावादी दृष्टिकोन मांडला असून जिल्हा निर्मितीपासून ते सर्व मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेपर्यंत सातत्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. एकूणच, सत्र न्यायालय हा किनवटसाठी नवा टप्पा ठरत असून येथून पुढे जिल्हा निर्मिती, शिक्षण, आरोग्य, तांत्रिक विकास व रोजगार या सर्वच क्षेत्रात किनवट वासीयांना नवे पर्व उजाडणार असल्याचा विश्वास आमदार केराम यांनी व्यक्त केला.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. गीमेकर यांनी केले. अध्यक्षीय समारोप ॲड. किशोर मुनेश्वर यांनी केला, तर आभार प्रदर्शन ॲड. राहुल सोनकांबळे यांनी केले. प्रास्ताविक ॲड. दिलीप काळे यांनी सादर केले.

    मंचावर आमदार भिमराव केराम यांच्यासह कार्यक्रमाध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, दिनकर चाडावार, आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, मंडल अध्यक्ष स्वागत आयनेनिवार, ज्येष्ठ ॲड. गावंडे, ॲड. काझी, ॲड. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. माहूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ढगे व किशन राठोड यांची विशेष उपस्थिती होती. तर किनवट अभिवक्ता संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. माझ बडगुजर यांनी परिश्रम घेतले.

    किनवट प्रतिनिधी दि.19 : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करून त्यासाठी सतत पाठपुरावा करून आवश्यक निधी व नगर परिषद क्षेत्रातील इमारत तथा जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल किनवट अभिवक्ता संघातर्फे आमदार भिमराव केराम यांचा जाहीर सत्कार सोहळा दिनांक 14 ऑगस्ट रोजी साई वंदना मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आमदार केराम म्हणाले की, “किनवटसाठी सत्र न्यायालय मंजूर झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना न्यायप्रविष्टतेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यानंतरही प्रवास खूप मोठा असून किनवट जिल्हा निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.”त्यांनी स्पष्ट केले की, याआधी किनवटसाठी मंजूर झालेल्या अनेक प्रशासकीय कार्यालये व योजना नांदेड किंवा भोकर येथे वळवल्या गेल्या. “भोकरचे सत्र न्यायालय असो, उड्डाण पूल असो वा सहाय्यक पोलिस अधीक्षक कार्यालय असो – ही कार्यालये किनवटसाठी मंजूर असूनही अन्य ठिकाणी वळवली गेली. आज तीच मंडळी किनवटसाठीच्या श्रेयाचे दावे करीत आहेत. मात्र सत्य हेच की, गेल्या अनेक वर्षांपासून किनवटला न्याय मिळत नव्हता आणि यासाठी मी व स्थानिक जनतेने सातत्याने संघर्ष केला.”आमदार केराम यांनी पुढे सांगितले की, आता किनवट व परिसरातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक व प्रशासकीय सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी विधायक पावले उचलण्यात येणार आहेत. “सत्र न्यायालयाच्या स्थापनेनंतर उच्च दर्जाचे शैक्षणिक संस्थान, आरोग्य विषयक सुविधा, प्रशासकीय कार्यालये, तसेच रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक व औद्योगिक प्रकल्प या भागात आणणे हाच माझा पुढील उद्देश आहे. यासाठी मला किनवटच्या सर्व पक्ष, संघटना व नागरिकांची साथ अपेक्षित आहे.”या विधानातून केराम यांनी किनवट मतदारसंघाच्या भविष्यासाठी एक विधायक व आशावादी दृष्टिकोन मांडला असून जिल्हा निर्मितीपासून ते सर्व मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेपर्यंत सातत्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. एकूणच, सत्र न्यायालय हा किनवटसाठी नवा टप्पा ठरत असून येथून पुढे जिल्हा निर्मिती, शिक्षण, आरोग्य, तांत्रिक विकास व रोजगार या सर्वच क्षेत्रात किनवट वासीयांना नवे पर्व उजाडणार असल्याचा विश्वास आमदार केराम यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. गीमेकर यांनी केले. अध्यक्षीय समारोप ॲड. किशोर मुनेश्वर यांनी केला, तर आभार प्रदर्शन ॲड. राहुल सोनकांबळे यांनी केले. प्रास्ताविक ॲड. दिलीप काळे यांनी सादर केले.मंचावर आमदार भिमराव केराम यांच्यासह कार्यक्रमाध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, दिनकर चाडावार, आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, मंडल अध्यक्ष स्वागत आयनेनिवार, ज्येष्ठ ॲड. गावंडे, ॲड. काझी, ॲड. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. माहूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ढगे व किशन राठोड यांची विशेष उपस्थिती होती. तर किनवट अभिवक्ता संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. माझ बडगुजर यांनी परिश्रम घेतले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed