Sanjay Raut on Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट मोदी-अमित शहांवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार हे दुबईमध्ये करत आहे, त्यांचा पैसा तिथे इन्व्हेस्ट असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दहशतवाद आणि क्रिकेट कधी एकत्र होऊ शकत नाही. दिल्ली असो किंवा मुंबई ज्या ज्या वेळी झालं तेव्हा आम्ही पीच उखडलं आहे. जर आता पाकिस्तानसोबत क्रिकेटची मॅच भारतात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आमची भूमिका तीच असेल. आमचे शिवसैनिक मॅच होऊ देणार नाहीत. ते दुबईमध्ये मॅच ठेवत आहेत. क्रिकेटचे मुख्य कोण आहेत तर अमित शहा यांचा मुलगा जय शाह आहे. सर्वात जास्त बेटिंग क्रिकेटमध्ये होत, भाजप सरकार हे दुबईमध्ये करत आहे, त्यांचा पैसा तिथे इन्व्हेस्ट केलेला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे.
Anjali Tendulkar : अर्जुनच्या लग्नाची धामधूम, ‘वरमाय’ अंजली सचिन तेंडुलकरची विरारमध्ये फ्लॅट खरेदी, स्टॅम्प ड्युटीत बचत, किंमत…
ज्या महिलांचं सिंदूर पुसलं त्याचा आक्रोश अजून संपलेला नाही आणि त्या देशासोबत हे क्रिकेट खेळत आहेत. पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही असं म्हटलं होतं मग क्रिकेट कसं काय चालत आहे. भाजप पक्षाला याची लाज वाटली पाहिजे, जर दुसरा कोणता सरकार असतं, तर हेच भाजपचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते. जर भारत पाकिस्तान सामना महाराष्ट्रात किंवा भारत देशात असता तर आम्ही हा सामना होऊ दिला नसता. खरे शिवसेनेची भूमिका हीच असणार जे खोटी शिवसेना आहेत त्यांची यावर काय भूमिका आहे. मोदी आणि शान हिंदुत्व कुठे आहे? बोगस आहे हे सर्व, असं संजय राऊत म्हणाले.

