Husband Killed Wife In Jalgaon: चारित्र्यावर संशय आमि माहेरुन पैसे आणण्याचा तगादा, या वादातून एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची भयंकर घटना जळगावात घडली आहे. यानंतर पतीने स्वत: पोलिसांत जात आत्मसमर्पण केलं.
नितीन आणि अर्चना यांच्यात वाद सुरू होता. त्यात नितीन हा अर्चनाच्या चारित्र्यावतर संशय घेत होता. तसेच, माहेरून दहा लाख रुपये आणा, यासाठी त्याने तगादा लावला होता. त्या वादातूनच मध्यरात्री अर्चना झोपेत असताना नितीन याने तिच्यावर शस्त्राने वार केले. घटनेनंतर तिला जिल्हा रुणालयात नेण्यात येत असतानाच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण खून केल्याचे सांगत नितीन हा लोहारा येथे पोलिसांना शरण गेला. याप्रकरणी मयत अर्चनाची सासू बेबाबाईलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
MP News: I Love You बेटा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, Video मध्ये धाय मोकलून रडली अन् मग… एका आईची सुन्न करणारी कहाणी
सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना
जळगाव जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी हत्येची ही घटना घडलीआहे. 17 ऑगस्टला रोजी लालगोटा (मुक्ताईनगर) येथे एका व्यक्तीची हत्या झाली होती. 18 ऑगस्टला जळगावात तरुणाची हत्या, 19 ऑगस्टला बोरनार येथे पत्नीवर कुन्हाडीने हल्ला करून पतीची आत्महत्या आणि आता पाचोरा येथे संशयातून पत्नीच्या खूनाची ही घटना घडली आहे.पिंपळगात हरेश्वर पोलिस ठाण्याच्यासहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मायांनी अटकेत असलेल्या नितीन आणि बेबाबाई शिंदे यांना पाचोरा न्यायालयात हजर केले आहे. दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jalgaon News : देवीच्या मूर्तीवरून भावकीतील वाद पेटला, दोन दिवसांत दोन खूनांनी जळगाव हादरलं
सायंकाळीच माहेरून आली होती महिला
मयत अर्चना ही शिवना येथील आपत्या नातेवाईकांना भेटून सायंकाळीच लोहारा येथे आल्याचे बोलले जात आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. या घटनेनंतर या चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे.

