Baramati News: बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे १५ ऑगस्ट रोजी निलेश सोपान अडागळे या ३४ वर्षीय तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. शेतातील मोटर बंद करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, निलेश अडागळे हे कोऱ्हाळे बुद्रुकमधील लोकप्रिय व्यक्ती होते. ते शेतात मोटर बंद करायला गेले होते. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला. “शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : ‘हॅलो मी महसूलमंत्री बावनकुळेंचा PA बोलतोय…’; शेतकऱ्याला मंत्र्यांच्या नावाने फेक कॉल, नेमकं काय प्रकरण?
निलेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगी अदिती (वय १०), मुलगा अर्णव (वय ७) आणि वडील सोपान अडागळे असे कुटुंबीय आहेत. त्यांचे वडील एसटीमध्ये कंडक्टर होते आणि आता निवृत्त झाले आहेत. त्यांचे बंधू गणेश सोपान अडागळे हे कीर्तनकार आहेत.
निलेश हे तरुण मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रिय होते. “निलेश यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात प्रिय होते,” असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने गावाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, गावकरी त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याची आठवण नेहमी राहील, असंही ग्रामस्थ म्हणाले.

