BJP Ram Shinde: कर्जत-जामखेडमधील पराभवानंतर राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी रोहित पवारांना आमदार बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप करत, शिंदे यांनी या ‘भावकी’च्या राजकारणामुळेच आपला पराभव झाल्याचा दावा केला.
राम शिंदे यांनी दावा केला की, अजित पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे मला सातत्याने टॉर्चर करण्याचा प्रयत्न आहे. त्यांमुळे याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना योग्य निर्णय घेण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजित पवार यांनी वारंवार अशा वक्तव्यांद्वारे “शिळ्या कढीला उत आणण्याचा” प्रयत्न केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात माझ्या पराभवामागे पवार कुटुंबातील अघोषित करार आणि नियोजित कट होता, असा हल्लाबोल राम शिंदे यांनी केला आहे. पुढे शिंदे यांनी म्हटले की, अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही आणि त्यांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत. यामुळे त्यांचा पराभव 1 हजार 243 मतांनी रोहित पवार यांच्याकडून झाला, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
भाजपचं धक्कातंत्र, महाराष्ट्राचे राज्यपाल होणार देशाचे उपराष्ट्रपती? NDA कडून अधिकृत उमेदवाराची घोषणा
दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. राम शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना, अजित पवार यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांचा गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात पवार काका-पुतण्यात जुगलबंदी रंगली होती. “मी भावकीकडं लक्ष दिलं, त्यामुळे तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा की किती मतं पडली आहेत, आपण पोस्टल बॅलेटमध्ये निवडून आला आहे. त्यामुळे माझ्या कुणी नादाला लागू नका,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

