Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारने खुश केलं आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हफ्ता वितरीत केला आहे. यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. पण राज्यातील 26 लाख लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. पण आता लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण राज्य सरकार आता राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहे. राज्यातील 26 लाख महिलांच्या घरी जावून चौकशी केली जाणार आहे.
महिला बालकल्याण विभागाचं जिल्हा प्रशासनाला पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी विविध निकष ठेवण्यात आले होते. त्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केला होता. आता सरकार घरोघरी जावून लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची चौकशी करण्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेशाचं पत्र देण्यात आलं आहे.
अंगणवाडी सेविका कसा तपास करणार?
जिल्हा पातळीवरील महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही अपात्र लाभार्थी महिला शोधण्याची मोहीम आता सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र दोन पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्षे वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. या महिलांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाने तयार केली आहे.
अंगणवाडी सेविका असलेल्या एका महिलेने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “दोन प्रकारचे निकष सांगितले आहेत. वयोमर्यादा बरोबर आहेत, बोगस कागदपत्रे भरले आहेत का, अशा प्रकारची तपासणी करा. त्यांचा निर्गम उतारा पाहा, टीसी पाहा, अशा प्रकारची तपासणी करा. घरातील तीन महिला असतील तर दोघांना पात्र करा आणि एकीला अपात्र करा. टॅक्सधारक, वाहनधारक, चारचाकी आहे का, याची तपासणी करा. चारचाकीचा नंबर बघा. याबाबत घरोघरी जावून चौकशी करा, असा आदेश दिला आहे”, अशी प्रतिक्रिया एका अंगणावाडी सेविकेने दिली.

