• Mon. Sep 7th, 2026
Marathi News LIVE Updates : लातूरमध्ये शेतीच्या विक्रीसाठी मुलानेच केली आपल्या आईची हत्या

हर्णे बंदरात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधवांची समृद्ध हंगामाची प्रार्थना

“सन आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा! मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा” या गाण्यांच्या तालावर हर्णे बंदरात नारळी पौर्णिमेनिमित्त जल्लोषाचा माहोल रंगला. कोळी समाजाच्या परंपरेतील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी, विविध संघटनांच्या सहभागातून पारंपरिक मिरवणुका, सजवलेल्या होड्या आणि सोन्याचा नारळ अर्पण करण्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. रत्नागिरी शहरातही जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व मान्यवरांच्या उपस्थितीत समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed