Girlfriend Refusal to Marry Boyfriend Committed Suicide : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकर तरुणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रियसीने लग्नास दिला नकार तरुणाने इंस्टाग्राम वर व्हिडिओ करीत घेतला टोकाचा निर्णय, जळगावमधील अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील गौरव बोरसे असे तरुणाने नाव आहे #Jalgaon #JalgaoinNews #viralvideo pic.twitter.com/6CbG7KIQ0n
— Harish Malusare (@harish_malusare) August 7, 2025
‘चार वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मला विसरून जा. असं कसं सांगू शकते तू’? असा सवाल देखील या तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत विचारला आहे. ‘आई तू माझ्या मृत्यूनंतर जास्त रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील खूप गरीब माणूस आहे, त्यांना त्रास देऊ नकोस, त्यांना पण सांग’, असं देखील त्याने या व्हिडिओमधून म्हटलं आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गौरवने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Ratnagiri Crime : कोकणात निवृत्त शिक्षिकेला राहत्या घरी संपवलं, हात-पाय घट्ट बांधलेली बॉडी सापडली, पोलिसांचा मोठा फौजफाटा
‘प्रेमात मी खूप दुःखी आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे. तुम्ही हा निर्णय घेऊ नका माझे वडील खूप गरीब माणूस आहे. प्रेमामध्ये चुकीचा निर्णय मित्रांनो घेऊ नका. जो आज मी प्रेमामध्ये चुकीचा निर्णय घेत आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मित्रांनो मला माफ करा. मला प्रेमात खूप त्रास होत आहे, म्हणून मी हा निर्णय घेत आहे’, असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

