35 वर्षे भाजपशी एकनिष्ठ असलेल्या नेत्याने आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद अजून वाढली आहे.
या प्रवेशावरून देखील अनेक राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहवयास मिळाले आहे. तर अजित पवार यांच्या बीड जिल्हा दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेले स्वागताचे बॅनर वरून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात बीड जिल्ह्यात गटबजी होत असल्याचे समोर आली आहे. अजित पवार यांचे स्वागत बॅनरने सर्व शहरभर लावले गेले. मात्र त्या बॅनरवर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचे फोटो लावण्याचे टाळण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.
पालकमंत्री नाहीत अन् मतदारसंघाशी संबंध नाही
याविषयी खुद राजाभाऊ मुंडे यांनी म्हटले आहे की त्यांचे फोटो लावण्याचे काही कारण नाही जर ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असते तर नक्कीच त्यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला असता मात्र ते पालकमंत्री नाहीत आणि त्यांचा आमच्या माजलगाव मतदार संघात काहीच संबंध नाही म्हणून त्यांचे फोटो लावणे आवश्यक वाटले नाही असे राजाभाऊ मुंडे यांनी बोलताना म्हंटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीत उपस्थिती
आज झालेल्या बीड जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीमध्ये आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित होते मात्र त्या पुढील कार्यक्रमात धनजंय मुंडे हे दिसले नाहीत. आता होत असलेल्या वडवणी येथील मेळाव्यात देखील ना धनंजय मुंडे यांनी येण्याचे टाळले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.या निमित्ताने परत एकदा अजित पवार यांच्या पक्षात गटबाजी होत आहे ती कश्या पद्धतीने दूर करणार आता हे पाहणे आवश्यक आहे.

