• Thu. Jul 2nd, 2026

    ‘महाॲग्री एआय धोरण’ या विषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 6, 2025
    ‘महाॲग्री एआय धोरण’ या विषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत – महासंवाद




    मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात “महाॲग्री एआय धोरण” चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 8, शनिवार दि. 9, सोमवार दि. 11 आणि मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत कृषी विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी घेतली आहे.

    कृषी विभागाने “महाॲग्री एआय धोरण 2025-2029” नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अन्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर कसा करण्यात येणार, धोरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार, या धोरणाचा उद्देश, स्वरूप, “विकसित भारत 2047” सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत असलेले धोरणातील उपक्रम, राज्यात या धोरणाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

     

    000

    जयश्री कोल्हे/स.सं

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed