Ajit Pawar Beed Visit : येत्या ७ ऑगस्टला अजित पवारांचा बीड दौरा आयोजित आहेय. यावेळी रजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे शहरात बॅनर लागले आहेत. पण यावर धनंजय मुंडेंचा बॅनर मात्र नाही आहे. त्यामुळे बॅनरची चर्चा रंगली आहे.
पण पक्षप्रवेशाआधी मात्र अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. शहरात चौकाचौकात लागलेल्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचा फोटो असणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो गायब आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थक आणि पक्षाचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांच्या बॅनरवरून आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बॅनरबाजी वरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये देखील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. दोन गटातील उघड नाराजी बॅनरच्या माध्यमातून समोर आली आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार; 29 ऑगस्टला आंदोलकांसह मुंबईत धडकणार
पक्षातील नाराजीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार काही उपाय काढणार का? हे येत्या 7 ऑगस्टच्या बीड दौऱ्यातच स्पष्ट होणार की काही वेगळे चित्र पाहावयास मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

