Chhatrapati Sambhajinagar Man Dies By Drowning: एक तरुण आपल्या मित्रांसह शहरातील हर्सूल तलावावर गेला होता. तिथे गप्पा मारत असताना अचानक या तरुणाने तलावात उडी घेतली आणि तो बुडाला.
शेख अयाज शेख सलीम (वय 30, राहणार बारीक कॉलनी) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अयाज हा कुटुंबासह बारीक कॉलनीमध्ये राहतो. तो विवाहित असून त्याला तीन अपत्य आहेत. शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
Andhra Pradesh News: काळजी घे, मी यावेळी तुला राखी बांधू शकणार नाही; भावासाठी अखेरचं पत्र लिहून विवाहितेने जीव दिला
दरम्यान, सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आयाज हा दोन मित्रांसह हर्सूल तलावाजवळ गेला. तीन मित्र गप्पा मारत असताना आयाजने तलावात उडी मारली. मित्रांना काही कळण्याच्या आत अयाज हा पाण्यात बुडत होता. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ आरडा ओरड करत नागरिकांना मदतीसाठी आवाज दिला. थोड्यावेळाने अग्निशामक विभागाचे जवान तलावाजवळ आले.
त्यांनी तात्काळ शोधकार्य सुरू केलं. बराच वेळ जाऊनही आयाजचा शोध लागला नाही. रात्र झाल्याने अग्निशामक विभागाला शोधकार्य थांबवावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अग्निशामक विभागाचे अशोक खांडेकर, अग्निशामक अधिकारी दीपराज गंगावणे, एच.वाय घुगे, संजय कुलकर्णी, संदीप चव्हाण, कॉन्स्टेबल रामेश्वर कदम यांनी अथक प्रयत्न केल्यानंतरशोध कार्य सुरू केले अखेर अयाज याचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढतात कुटुंबीयांनी टाहो फोडला. दरम्यान या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

